ये रे ये रे पाऊसा, तुला देतो पैसा…..

ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पावसा पावसा येरे तुला देतो पैसा ह्या पावसाळ्यात संक्लप करू कमीत कमी २ झाडे लाऊ..

तहान” या मोहिमेअंतर्गत आम्ही पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवण्याचे ठरवलेले आहे. जसे आपणास माहीतच आहे की गेल्या 40 वर्षातील सर्वात भयंकर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात पडला आहे आणि लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही.

तहान व संलग्न सामाजिक संस्थांमार्फत तर्फे देऊळगाव रसाळ, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, कुतवळवाडी, पानसरेवाडी आणी साबळेवाडी. ह्या गावांमध्ये टँकरने द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

भूजल पातळी खालावली आहे तसेच अनेक जलाशये जवळपास कोरडी पडलेली आहेत. तर अशा दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबाना प्रत्येकी 200 लिटर्स पाणी किमान 4 दिवसांनी टँकर्सने पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांची आत्यंतिक निकड लक्षात घेता त्यांना हे पाणी पुरेस होईल असा आमचा अंदाज आहे.

एका फेरीमध्ये आम्ही साधारण 1200 कुटुंबाना पाणी पुरविण्याची सोय आम्ही बारामती शहरामधून करत आहोत आणि या कुटुंबाना एवढा एकच पाण्याचा स्रोत सध्या उपलब्ध आहे. पाण्याअभावी अशा दुष्काळग्रस्त भागातील होणाऱ्या शहरांकढील स्तलांतराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि गोट्यातील जनावरे विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

आम्ही पुण्यातून पाणी पुरवठा करण्यासाठी मदतनिधी गोळा करत आहोत. आम्ही तुम्हाला या कार्यामध्ये मदत करण्याचे आवाहन करतो जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचवता येईल आणि त्या लोकांची जगण्याची आशा पल्लवित ठेवता येईल.

तुम्हाला शक्य असेल तेवढी रक्कम आमच्याकडे जमा करून या सद्हेतूस हातभार लावा. तुमची अगदी छोटी मदतसुद्धा काही जीव वाचवू शकते.आपले सहकार्य हीच आमची सामाजिक कार्य निस्वार्थ करण्यासाठीची प्रेरणा.

दुष्काळ पडलेल्या भागात पाणी पोचवण्यासाठी आमच्या ‘तहान’ या मोहिमेला पुढे चालू ठेवण्यासाठी आता आम्हास आपली मदत हवी आहे. आपल्या मदतीमुळे आम्ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील आणखी दुर्गम भागात पोचू शकू. आपणही एक संवेदनशील व्यक्ती म्हणून या कामास आर्थिक मदत करावी, असं नम्र आवाहन आम्ही आपणांस करत आहोत.

मदतीसाठी संपर्क:

https://www.ketto.org/tahaanefforts

https://www.facebook.com/tahaanefforts

https://twitter.com/tahaanefforts

सनी : 8888771773

पुष्कर : 9673951222

कल्याण : 8983155829

झाडे लावा !! झाडे जगवा !!!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यातील संकट टाळा’

#‎tahaan‬ ‪#‎panibachao‬ ‪#‎tahaanefforts‬ ‪#‎SaveWater‬ ‪#‎drought‬ ‪#‎Pune‬ ‪#‎Baramati‬

Source : Chintoo

 

Advertisements