तीव्र दुष्काळाचे चटके..

बारामती परिसरात विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे अन्य स्त्रोत बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तहानचे स्वयंसेवक एप्रिल महिन्यात दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत, उंडवडी सुपे गावात गेले तेव्हा परिस्थिती फार भयानक होती. पाणी पुरवठा करणारी विहीर/आड मध्ये पाण्याने तर अक्षरश तल गाटला होता. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर दुपारच्या उन्हात वणवण करावी लागत आहे. ग्रामस्त ट्रैक्टर व दुचाकीवरून जिथे मिळेल तेथून पाणी आणत आहेत. हा वीडियो नक्की पूर्ण बघा , तुम्हाला दुष्काळाची तीव्रता जाणवेल.

यंदा दुष्काळामुळे सर्वत्र भयानक परिस्थिती आहे. विहिरी कोरडया पडल्या आहेत. तलावांतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे सर्वाचीच चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. टंचाईला तोंड देणे ही दररोजची समस्या शेतक-यांपुढे ‘आ’ वासून उभे आहे.

“तहान” या मोहिमेअंतर्गत आम्ही पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवण्याचे ठरवलेले आहे. जसे आपणास माहीतच आहे की गेल्या 40 वर्षातील सर्वात भयंकर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात पडला आहे आणि लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नाही.

तहान व संलग्न सामाजिक संस्थांमार्फत तर्फे देऊळगाव रसाळ, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, कुतवळवाडी,  पानसरेवाडी आणी साबळेवाडी. ह्या गावांमध्ये टँकरने द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

भूजल पातळी खालावली आहे तसेच अनेक जलाशये जवळपास कोरडी पडलेली आहेत. तर अशा दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबाना प्रत्येकी 200 लिटर्स पाणी किमान 4 दिवसांनी टँकर्सने पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांची आत्यंतिक निकड लक्षात घेता त्यांना हे पाणी पुरेस होईल असा आमचा अंदाज आहे.

एका फेरीमध्ये आम्ही साधारण 1200 कुटुंबाना पाणी पुरविण्याची सोय आम्ही बारामती शहरामधून करत आहोत आणि या कुटुंबाना एवढा एकच पाण्याचा स्रोत सध्या उपलब्ध आहे. पाण्याअभावी अशा दुष्काळग्रस्त भागातील होणाऱ्या शहरांकढील स्तलांतराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि गोट्यातील जनावरे विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

आम्ही पुण्यातून पाणी पुरवठा करण्यासाठी मदतनिधी गोळा करत आहोत. आम्ही तुम्हाला या कार्यामध्ये मदत करण्याचे आवाहन करतो जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचवता येईल आणि त्या लोकांची जगण्याची आशा पल्लवित ठेवता येईल.

तुम्हाला शक्य असेल तेवढी रक्कम आमच्याकडे जमा करून या सद्हेतूस हातभार लावा. तुमची अगदी छोटी मदतसुद्धा काही जीव वाचवू शकते.आपले सहकार्य हीच आमची सामाजिक कार्य निस्वार्थ करण्यासाठीची प्रेरणा.

दुष्काळ पडलेल्या भागात पाणी पोचवण्यासाठी आमच्या ‘तहान’ या मोहिमेला पुढे चालू ठेवण्यासाठी आता आम्हास आपली मदत हवी आहे. आपल्या मदतीमुळे आम्ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील आणखी दुर्गम भागात पोचू शकू. आपणही एक संवेदनशील व्यक्ती म्हणून या कामास आर्थिक मदत करावी, असं नम्र आवाहन आम्ही आपणांस करत आहोत.

मदतीसाठी संपर्क:

https://www.ketto.org/tahaanefforts

https://www.facebook.com/tahaanefforts

सनी : 8888771773

पुष्कर : 9673951222

कल्याण : 8983155829

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यातील संकट टाळा’

#‎tahaan‬ ‪#‎panibachao‬ ‪#‎tahaanefforts‬ ‪#‎SaveWater‬ ‪#‎drought‬ ‪#‎Pune‬ ‪#‎Baramati‬

Advertisements

We are excited to hear you :)

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s